Sangli Today | शिराळा : शिराळा नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने निर्णायक विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. शिवसेना (शिंदे गटा) चे पृथ्वीसिंग नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजीत नाईक यांचा पराभव करत नगराध्यक्षपदावर विजय मिळवला.
या निकालातून आमदार सत्यजित देशमुख आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखालील महायुतीवर मतदारांनी विश्वास टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरपंचायतीत एकूण ११ सदस्य महायुतीचे निवडून आले असून, त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे दोन नगरसेवक विजयी झाले आहेत.
विरोधी बाजूला संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, तर राष्ट्रवादी पुरस्कृत दोन असे एकूण सहा सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक शिवसेना-भाजप महायुती विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी अशी अत्यंत चुरशीची व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली.
निकाल जाहीर होताच शिराळा शहरात गुलाल उधळणी, ढोल-ताशे आणि डॉल्बीच्या गजरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात विजयोत्सव साजरा केला.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









