Sangli Today | मिरज : गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, संयोगिता पाटील कैम्ब्रिज स्कूलचा वार्षिक स्नेहमेळावा रविवारी (21 डिसेंबर 2025) रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मागील शैक्षणिक वर्षात उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वा. सावरकर प्रतिष्ठान, विश्रामबाग (सांगली) चे संस्थाध्यक्ष विजय नामजोशी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मागील शैक्षणिक वर्षात उज्वल कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आंतरशालेय विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
या स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाट्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणातून आपले कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. पालक, शिक्षक आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमास उपस्थित मा. पृथ्वीराज पाटील यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधत शाळेच्या शैक्षणिक वाटचालीबाबत समाधान व्यक्त केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कला, आत्मविश्वास आणि यश सादर करण्याची संधी मिळाल्याने कार्यक्रमाने शैक्षणिक व सांस्कृतिक समन्वयाचे सकारात्मक चित्र उभे केले, अशी प्रतिक्रिया पालकवर्गातून व्यक्त होत आहे.
हेही वाचा: सांगलीत भीषण स्फोट; पाच किलोमीटर परिसर हादरला.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










