सांगली : तुंग–कारंदवाडी शिव हद्दीतील शेतफडात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे तीन नवजात बछडे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदाशिव दळवी यांच्या शेतात सकाळी सुमारे अकराच्या सुमारास ही बाब लक्षात आली.
घटनेची माहिती मिळताच सांगली वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनकर्मचाऱ्यांनी शेताची पाहणी करून बछड्यांना सुरक्षित ताब्यात घेतले. प्राथमिक तपासणीत हे बछडे अंदाजे आठ ते दहा दिवसांचे असून ते अशक्त अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बछड्यांची तपासणी करून आवश्यक प्राथमिक उपचार तसेच अन्न दिले. मादी बिबट्या पुन्हा बछड्यांच्या शोधात परिसरात येण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाने शेतफड आणि आजूबाजूच्या परिसरात कॅमेरे बसवले आहेत. शिराळा वनविभागाच्या पथकाकडून या भागात सतत गस्त सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांनी व शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे, तसेच बिबट्याचा वावर दिसून आल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: उमेदवारी अर्जांच्या विक्रीला मोठा प्रतिसाद; दोन दिवसांत 1,146 अर्जांची विक्री.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










