सांगली : तीन वर्षांत मोठा आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवून चौघांकडून सुमारे ५ लाख ७६ हजार रुपये गुंतवणूक करून घेतल्याप्रकरणी दोघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दाजी कृष्णा पाटील (वय ६८, रा. जयसिंगपूर) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, संजय बाळू डोळस (रा. पुणे) आणि राम सदाशिव कांबळे (रा. तासगाव) यांनी ‘रॅपिड टेक्नॉलॉजी’ या कंपनीत गुंतवणूक केल्यास तीन वर्षांत मोठा परतावा मिळेल, असे सांगून पाटील यांच्याकडून १ लाख १९ हजार रुपये गुंतवणूक करून घेतली.
यानंतर पाटील यांचे मित्र मनोज साळसकर, संदेश कांबळे आणि श्यामसुंदर सूर्यवंशी यांच्याकडूनही रक्कम गुंतवण्यात आली. एकूण गुंतवणूक रक्कम सुमारे ५ लाख ७६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
काही काळानंतर विश्रामबाग परिसरातील संबंधित कंपनीचे कार्यालय बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर तक्रारदाराला गुंतवलेल्या रकमेपैकी काही रक्कम परत करण्यात आली; मात्र उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने अखेर विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, विश्रामबाग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाच : आमराई क्लब येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या संयुक्त मुलाखती पार.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










