सांगली : कळंबा कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीच्या स्वागतासाठी सांगली शहरात सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून आतिषबाजी केल्याप्रकरणी 14 जणांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव नंदू साळसकर (रा. गवळी गल्ली, सांगली) हा आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर बुधवारी दुपारच्या सुमारास सांगलीत दाखल झाला. यावेळी त्याच्या समर्थकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत फटाके फोडून आनंद व्यक्त केला. या प्रकारामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करत बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, याप्रकरणी अभिजित नंदू साळसकर, साहिल सय्यद, अमित उर्फ गोट्या कांबळे, गणेश पवार, सूरज माने, अक्षय गायकवाड (सर्व रा. गवळी गल्ली, सांगली) आणि आकाश घबाडे (रा. सांगलीवाडी) यांच्यासह इतर अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचारी विशाल कोळी यांनी या प्रकरणाची फिर्याद दिली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा: सांगलीतील ‘या’ गावात चार वर्षांपासून दररोज केल जात आहे सामुदायिक राष्ट्रगीत गायन.
- शिराळ्यातील बेलदारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी










