आष्टा : (सांगली) : मुलीला तलाठी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून वाळवा तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची साडेबारा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी हमजेखान गुलाब मुजावर (वय 69, रा. इस्लामपूर रोड, वाळवा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संशयित जहांगीर गुलाब गोलंदाज (रा. टाकाळा, कोल्हापूर) याने त्यांच्या मुलीला तलाठी पदावर नोकरी लावून देतो, असा दावा करत विश्वास संपादन केला.
डिसेंबर 2023 पासून विविध टप्प्यांत संशयिताने फिर्यादीकडून रोख 50 हजार रुपये तसेच आरटीजीएसद्वारे 12 लाख रुपये स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे नोकरी न मिळाल्याने तसेच पैसे परत न केल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
पैशांची मागणी केल्यानंतर संशयिताने पैसे परत देणार नसल्याचे सांगत धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. या तक्रारीच्या आधारे आष्टा पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










