सांगली : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटा) मध्ये प्रवेश केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली शहरातील स्नेहलताई सावंत, अभिजित भोसले, नसीमा नाईक आणि सचिन सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. याआधी मिरजेतही काही कार्यकर्त्यांच्या पक्षांतराच्या घटना घडल्या होत्या.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून संघटनात्मक हालचाली सुरू असून, कार्यकर्त्यांचे पक्षांतर हे त्याच प्रक्रियेचा एक भाग असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या घडामोडींचा नेमका कोणत्या पक्षाला फायदा होणार हे पुढील काळात स्पष्ट होईल.
हेही वाचा: नोकरीच्या आमिषाने साडेबारा लाखांची फसवणूक; वाळव्यातील प्रकार, एकाविरुद्ध गुन्हा दाखल.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










