“प्रत्येक मत, भविष्याचा कणा!” — सांगलीत नवमतदारांनी घेतली निर्भय मतदानाची शपथ

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : वि. स. खांडेकर अभ्यासिकेत आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रम

सांगली : लोकशाही ही केवळ शासनपद्धती नसून प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागातून ती सशक्त होत असते. सुजाण नेतृत्व घडवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे पवित्र कर्तव्य आहे, असा संदेश प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर यांनी दिला.

सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात SVEEP (मतदान जनजागृती) उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत वि. स. खांडेकर अभ्यासिका येथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुण व नवमतदारांसाठी विशेष मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर उपस्थित होते. अभ्यासिकेतील युवक हे देशाचे भविष्य असून त्यांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, यावर यावेळी भर देण्यात आला. मतदानाचे महत्त्व, मताधिकाराचे सामाजिक व राजकीय परिणाम तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रंथपाल संतोष बेलवलकर, भारत बंडगर, राहुल मुळीक, संतोष यादव व गुरांण्णा बगले यांनी मतदान प्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट करत उपस्थितांशी संवाद साधला. “मतदार राजा जागा हो… लोकशाहीचा धागा हो” या संदेशातून तरुणांना मतदानासाठी सज्ज होण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान नवमतदारांनी निर्भयपणे मतदान करण्याची शपथ घेतली. आगामी निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. अशा उपक्रमांमुळे लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा: वाळवा तालुक्यात २ किलो गांजा जप्त; कोल्हापूरच्या १८ वर्षीय तरुणास अटक.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा