कुपवाड–मिरज प्रभाग क्रमांक २ आणि ३: शिवसेना शिंदे गटाच्या यादीत वनखंडे कुटुंबाचा समावेश नाही

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
फोटो : सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) व भाजप पक्षचिन्हे

मिरज : आगामी सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुपवाड व मिरज परिसरातील काही प्रभागांमध्ये महायुतीतील उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. कुपवाड प्रभाग क्रमांक २ आणि प्रभाग क्रमांक ३ मधील शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवारीबाबत अद्याप स्पष्टता नाही.

राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, कुपवाड व मिरज भागातील प्रभाग क्रमांक २ मधून मोहन वनखंडे यांच्या पत्नी अनिता वनखंडे, तर प्रभाग क्रमांक ३ मधून त्यांचे पुत्र सागर वनखंडे हे महायुतीतून शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवार होते. मात्र, एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना उमेदवारी देण्याबाबत महायुतीत एकमत झाले नसल्याचे समजते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सुरेश खाडे यांनी एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना तिकीट देण्यास विरोध दर्शविल्याची चर्चा असून, या भूमिकेला शिवसेना शिंदे गटाकडूनही पाठिंबा दिला गेल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख पद मोहन वनखंडे यांच्याकडे असतानाही त्यांच्या कुटुंबातील कोणाच्याही नावाचा समावेश पक्षाच्या संभाव्य उमेदवार यादीत झालेला नाही.

यामुळे कुपवाड व मिरज परिसरातील राजकीय वर्तुळत चर्चा वाढल्या असून, पुढील रणनीतीबाबत वनखंडे कुटुंब कोणती भूमिका घेणार, याकडे स्थानिक राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महायुतीत अंतिम निर्णय न झाल्यास कुपवाड प्रभाग क्रमांक २ मधून भाजपकडील संभाव्य पॅनलबाबतही चर्चा सुरू आहेत. अनुसूचित जाती महिला गटातून प्राजक्ता धोतरे, ओबीसी पुरुष गटातून प्रकाश ढंग, सर्वसाधारण महिला गटातून मालूश्री खोत आणि सर्वसाधारण पुरुष गटातून प्रकाश पाटील यांची नावे चर्चेत असल्याचे समजते.

तसेच, प्रभाग क्रमांक ३ मधील अ, ब, क आणि ड गटांसाठी अनुक्रमे सुनीता व्हनमाने, शशिकला दोरकर, छाया जाधव आणि संदीप सुरेश आवटी यांची नावे संभाव्य पॅनलमध्ये चर्चेत असून, महायुतीतील वरिष्ठ स्तरावरुन अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक उभारण्यात यावे; आमदार गोपीचंद पडळकर यांची निवेदनाद्वारे मागणी.

TAGGED:
Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा