मिरज : पोलिस व सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून मिरजमधील एका निवृत्त एस.टी. अधिकाऱ्याची तब्बल सव्वा कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याने मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार रवींद्र कुलकर्णी हे मिरज येथील निवृत्त एस.टी. अधिकारी आहेत. ३ ते १२ सप्टेंबर या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी व्हॉट्सॲप कॉल व मोबाईलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. आपण पोलिस, सीबीआय व रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असल्याची बतावणी करत त्यांच्या नावाने बनावट बँक पासबुक, हवाला व्यवहार आणि मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले.
या कथित चौकशीदरम्यान, ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत खाते गोठवले जाईल व अटक होईल, असे सांगून बँक खात्यातील रक्कम पडताळणीसाठी इतर खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले. भीतीपोटी कुलकर्णी यांनी स्टेट बँक, एचडीएफसी आणि सेंट्रल बँकेतील रक्कम विविध कंपन्या व खात्यांमध्ये वर्ग केली.
मात्र, रक्कम वर्ग करूनही कोणतेही अधिकृत पत्र किंवा पडताळणी झाल्याचे समजले नसल्याने त्यांनी चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा: सांगली महापालिकेसाठी राष्ट्रवादी (दोन्ही गट) व काँग्रेस एकत्र लढण्याचे संकेत.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










