सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर अंतर्गत अस्वस्थतेचे चित्र निर्माण झाले आहे. उमेदवारी वाटपात डावलल्याच्या आरोपावरून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानशी संबंधित धारकरी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
महानगरपालिकेच्या एकूण ७८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार यादीत धारकरी कार्यकर्त्यांचा समावेश न झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे. धारकऱ्यांचे म्हणणे आहे की, लव जिहाद, गोरक्षण आणि हिंदुत्वाशी संबंधित मुद्द्यांवर सातत्याने सक्रिय राहून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडे पक्षाने दुर्लक्ष केले आहे.
पक्षाने जनमानसात फारशी ओळख नसलेले उमेदवार पुढे केल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोपही धारकऱ्यांकडून करण्यात आला आहे. यामुळे अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा आक्रमक पवित्रा काही कार्यकर्त्यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, धारकरी कार्यकर्ते राहुल बोळाज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने उपेक्षा केल्याने आता जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपावरून आधीच तणावाचे वातावरण असताना, धारकऱ्यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसांत या घडामोडींमुळे सांगलीतील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: सांगली बाजारात निकृष्ट दर्जाचा चायनीज बेदाणा; कारवाईची मागणी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










