सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६–२०३१ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून विविध प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार या गटाची प्रभागनिहाय उमेदवार यादी समोर आली असून, नागरिकांसाठी संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या यादीमध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्ग (OBC) अंतर्गत असलेल्या प्रभागांमधील उमेदवारांचा समावेश आहे. अनेक प्रभागांमध्ये महिला उमेदवारांनाही संधी देण्यात आल्याचे या यादीतून दिसून येते.
उपलब्ध माहितीनुसार ही उमेदवार यादी उमेदवारी अर्जांच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासनाकडून होणाऱ्या छाननीनंतर अंतिम उमेदवार निश्चित होणार आहेत. त्यामुळे पुढील टप्प्यात माघार किंवा बदल होण्याची शक्यता आहे.
सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आगामी काळात उमेदवारांची छाननी, वैधता तपासणी आणि माघार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची प्रभागनिहाय संपूर्ण उमेदवार यादी खाली PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा: कोणत्या प्रभागात कोण? काँग्रेस उमेदवारांची संपूर्ण यादी येथे पहा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










