सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६–२०३१ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाकडून विविध प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार पक्षाची प्रभागनिहाय उमेदवार यादी समोर आली आहे.
या यादीत सर्वसाधारण, महिला, अनुसूचित जाती तसेच इतर आरक्षण प्रवर्गांतील उमेदवारांचा समावेश आहे. काही प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवारांची नावे असल्याचेही या यादीनुसार दिसून येते. ही यादी उमेदवारी अर्जांच्या आधारे तयार करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून होणाऱ्या छाननीनंतर अंतिम उमेदवार निश्चित होतील.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील टप्प्यात छाननी, माघार आणि अंतिम यादी जाहीर होण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने या निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, प्रभागनिहाय उमेदवार उभे करत पक्ष ताकदीने मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाची संपूर्ण प्रभागनिहाय उमेदवार यादी खालील PDF मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – कोणत्या प्रभागात कोण? प्रभागनिहाय उमेदवार यादी येथे पहा.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










