Fake Income Tax Raid: कवठेमहांकाळ येथील तोतया अधिकार्‍यांच्या आयकर छापा प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Sangli Fake Income Tax Raid News

Kavathe Mahankal Latest News Today | सांगली : कवठेमहांकाळ येथे आयकर अधिकारी असल्याचे भासवून छाप्याचा बनाव करत तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याच्या प्रकरणात तपासाची गती वाढली आहे. पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले असून, संशयितांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.

ही घटना डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरात घडली होती. तोतया अधिकार्‍यांनी आयकर छाप्याचे नाटक करत घरातील १ किलो ४१० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ८४ लाख ६० हजार) आणि १५ लाख ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण एक कोटी २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील काढून नेत संशयितांनी आपला कोणताही ठसा राहू नये, याची काळजी घेतली होती.

तरीदेखील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि कवठेमहांकाळ पोलिसांच्या तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. याआधारे संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, यापूर्वी महाराष्ट्रातील इतर ठिकाणी अशाच पद्धतीने घडलेल्या घटनांची माहितीही सांगली पोलिसांनी मिळवली आहे. त्या संशयितांचा सध्याचा ठावठिकाणा शोधण्याचे काम सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत आणि लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल. तपासाबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत असून, कारवाईबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 पॉलिशच्या बहाण्याने वृद्ध महिलेकडून तीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एक आरोपी अटकेत, दोघे फरार.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा