ईश्वरपूर : ईश्वरपूर पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत चार देशी बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन असा सुमारे अडीच लाख रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी साहील मोहन मिसाळ (वय 26, रा. कासेगाव, ता. वाळवा) याला अटक करण्यात आली असून त्याचा एक साथीदार फरार आहे.
बुधवारी रात्री पेठ–नेर्ले महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ संशयास्पद हालचाली आढळून आल्याने ईश्वरपूर पोलिसांचे पथक सतर्क झाले. रात्रगस्ती दरम्यान संशयिताला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने बाजूच्या शेतात शस्त्रसाठा लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी त्या ठिकाणाहून चार देशी बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन जप्त केली. हा शस्त्रसाठा कराड येथील सोहेल तांबोळी याच्याकडून आणल्याचे आरोपीने सांगितले असून तो सध्या फरार आहे.
या कारवाईची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि उपअधीक्षक अरुण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. तसेच या यशस्वी कारवाईबद्दल निरीक्षक सोमनाथ वाघ आणि त्यांच्या पथकाचे कौतुक करण्यात आले.
या प्रकरणी पोलीस हवालदार अमोल सावंत यांनी आरोपींविरोधात भारतीय शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
हेही वाचा: सांगली महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर चाकूहल्ला; दोन संशयित ताब्यात, एकाचा शोध सुरू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










