शिराळा : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील सागाव येथे मोलॅसिस वाहतूक करणाऱ्या टँकरच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 30) सायंकाळी घडली. या अपघातात महिलेचे पती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावित्री मानसिंग पाटील (वय 65) व त्यांचे पती मानसिंग हंबीर पाटील (वय 75) हे दुचाकीवरून शेताकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर सावित्री पाटील रस्त्यावर कोसळल्या. टँकरचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात मानसिंग पाटील हे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेले. त्यांच्या दोन्ही पायांना व छातीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर टँकरचा चालक व क्लीनर घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिराळा पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून, टँकर चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास शिराळा पोलीस करत आहेत.
हेही वाचा: शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रविकासदल उमेदवारांची प्रभागनिहाय यादी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










