आष्टा : सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे डांगे कॉलेज बसथांब्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवार, दिनांक १ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
अपघातात आशा पंडितराव देशमुख (वय ६५, रा. मर्दवाडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात वाहनचालक पंडितराव भाऊसाहेब देशमुख (वय ७०), त्यांची मुलगी पूनम विकास पाटील (वय ४०, रा. पारगाव, जि. कोल्हापूर) आणि सुमित्रा अनिल लवटे (वय ४५, रा. मर्दवाडी) हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख कुटुंबीय मोटारीतून सांगलीहून आष्ट्याकडे निघाले होते. डांगे कॉलेज परिसरात पोहोचल्यानंतर समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकला टाळण्याचा प्रयत्न करत असताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मोटार थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली.
अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र आशा देशमुख यांची प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा: विश्रामबाग–विद्यानगर–वारणाली परिसरात चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद; नागरिकांची मोठी गैरसोय.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










