सांगली : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जनजागृतीसाठी सांगली जिल्ह्यात सिने व दूरचित्रवाणी क्षेत्रातील कलाकारांचा सहभाग घेण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत अभिनेते संदीप पाठक आणि ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब हे शुक्रवारी (दि. 9) जिल्ह्यातील काही गावांना भेट देणार आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी वाळवा तालुक्यातील येडनिपाणी, दुपारी पलूस तालुक्यातील सांडगेवाडी, तर त्यानंतर खानापूर–विटा तालुक्यातील आळसंद येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये हे कलाकार सहभागी होणार आहेत. या भेटीदरम्यान ग्रामस्थांशी थेट संवाद साधत अभियानाची उद्दिष्टे, ग्रामपंचायतींची भूमिका, लोकसहभागाचे महत्त्व तसेच शाश्वत विकासाशी संबंधित बाबी मांडल्या जाणार आहेत.
सिने कलाकारांविषयी ग्रामीण भागात असलेले प्रेम लक्षात घेता, त्यांच्या सहभागातून अभियानाबाबतची माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचवता येईल, असा प्रशासनाचा उद्देश आहे. संवाद आणि सादरीकरणाच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये सकारात्मक जनजागृती करण्यावर या कार्यक्रमांमध्ये भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी सुरू असून, कलाकारांच्या या दौऱ्यामुळे अभियानाच्या प्रचार-प्रसाराला चालना मिळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या जनजागृती कार्यक्रमांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगलीसह महाराष्ट्रातील पर्यटकांनी सागरेश्वर अभयारण्याला भेट द्यावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










