सांगली : सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी ‘MH 10 EW’ ही नवीन नोंदणी मालिका सोमवार, 12 जानेवारी 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नव्या MH 10 EW मालिकेसह इतर वाहनांसाठी आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असल्यास नियमानुसार तिप्पट शुल्क भरून तो मिळवता येणार आहे. पसंतीच्या क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करताना केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 5(अ) नुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. यामध्ये आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड यापैकी कोणत्याही वैध ओळखपत्राची साक्षांकित प्रत तसेच ई-मेल आयडी आवश्यक आहे.
पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीद्वारे देण्यात येणार असून, त्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज प्रक्रिया चालणार आहे. अर्जासोबत विहित शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे आवश्यक राहील.
एका क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, 13 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत जास्त रकमेचा डिमांड ड्राफ्ट सादर करणाऱ्या अर्जदारास तो क्रमांक देण्यात येणार आहे. आकर्षक क्रमांकासाठी 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
“ही माहिती अधिकृत प्रसिद्धीपत्रकावर आधारित आहे.”
हेही वाचा: ‘समृद्ध पंचायतराज’ अभियानाच्या जनजागृतीसाठी सिने कलाकारांचा सांगली दौरा; तीन गावांत कार्यक्रम.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










