सांगली : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांमध्ये लोकशाहीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी चिंतामनराव कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वतीने व्यापक मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरात 50 पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले असून, त्याद्वारे मतदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश मतदानाचा टक्का वाढवणे, नवमतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत जाणीव निर्माण करणे आणि प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी प्रेरित करणे हा आहे. शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणारा हा उपक्रम शहरासाठी आदर्श ठरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
कॉलेजमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात नवमतदारांना मतदानाची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांनी केवळ स्वतः मतदान करण्यापुरते मर्यादित न राहता, आपल्या पालकांशी, नातेवाईकांशी आणि शेजाऱ्यांशी संवाद साधून त्यांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
हा उपक्रम महापालिका प्रशासनाच्या निवडणूक जनजागृती (SVEEP) कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असून, प्रशासन आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वयातून शहरातील प्रमुख चौक, वसाहती, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या पथनाट्यांमधून मतदानाचे महत्त्व, मतदान न केल्याचे परिणाम, तरुणांची जबाबदारी आणि लोकशाहीतील नागरिकांची भूमिका प्रभावीपणे मांडली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागातून लोकशाही प्रक्रियेत तरुणांचा सक्रिय सहभाग वाढवण्यावर या अभियानाद्वारे भर देण्यात येत आहे.
हेही वाचा: 15 जानेवारीची सार्वजनिक सुट्टी कुणा-कुणाला लागू? शासनाच्या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घ्या.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










