Sangli Railway : बेंगळुरू–लोकमान्य टिळक एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाची मंजुरी; मात्र सेवा अजून सुरू नाही, प्रवाशांमध्ये नाराजी

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
छायाचित्र : Railway Board दस्तऐवज | स्रोत : Railway Pravasi Group (X) | संकलन : Sangli Today

सांगली : बेंगळुरू (SMVT) ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान सुरू होणाऱ्या 16553/16554 बेंगळुरू–लोकमान्य टिळक (T) एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाची अधिकृत मंजुरी मिळूनही ही गाडी अद्याप सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः सांगली जिल्ह्यातील मिरजसह अनेक स्थानकांवरील प्रवाशांना या गाडीची प्रतीक्षा आहे.

रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या ‘Railway Pravasi Group’ या संघटनेने X (पूर्वीचे Twitter) वर संबंधित मंत्र्यांना टॅग करत ही बाब सार्वजनिक केली आहे. या पोस्टमध्ये रेल्वे बोर्डाचा अधिकृत दस्तऐवजही शेअर करण्यात आला असून, त्यामध्ये या गाडीच्या सेवेला 9 डिसेंबर 2025 रोजी मंजुरी देण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येते.

रेल्वे बोर्डाचा दस्तऐवज काय सांगतो?

रेल्वे बोर्डाच्या (CC-298/2025) दस्तऐवजानुसार,

दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) कडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून, 16553/16554 SMVT बेंगळुरू – लोकमान्य टिळक (T) एक्सप्रेस ही आठवड्यातून दोन वेळा (Bi-weekly) धावणार असल्याचे नमूद आहे.

रेल्वे बोर्डाच्या दस्तऐवजानुसार या गाडीला हुबळी, मिरज, पुणे, लोणावळा आणि कल्याण ही प्रमुख थांबे असणार आहेत. याशिवाय दावणगेरे, धारवाड, बेळगाव, सांगली, कराड, सातारा, लोणंद, करजात आणि ठाणे या स्थानकांवरही व्यावसायिक थांबे देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

“मंजुरी असूनही सेवा अजून सुरू का नाही?” – प्रवाशांचा सवाल

रेल्वे प्रवासी समूहाने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, ही गाडी सामान्य प्रवाशांसाठी कमी खर्चिक आणि उपयुक्त ठरणार असताना, मंजुरी मिळूनही ती प्रत्यक्षात सुरू न होणे ही बाब निराशाजनक आहे. त्यामुळे लवकरात लवकर उद्घाटन करून ही सेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पोस्टमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, तेजस्वी सूर्या आणि संबंधित लोकप्रतिनिधींनाही टॅग करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाचा पुढील निर्णय प्रतीक्षित

दस्तऐवजात “सेवा सुरू करण्याबाबत पुढील कार्यवाही करावी” असे नमूद असले तरी, सध्या या गाडीच्या प्रत्यक्ष प्रारंभाबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाकडून पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, सांगली–मिरजसह मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वे मार्गावरील प्रवासी ही सेवा लवकर सुरू व्हावी अशी मागणी करत आहेत.

हेही वाचा: किर्लोस्करवाडी स्थानकावर वंदे भारत थांबते, मात्र 4 ते 8 आरक्षण काऊंटर बंद; प्रवाशांची तक्रार.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा