Sangli Crime : सांगलीवाडीत प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, पानमसाल्याचा सव्वा 30 लाखांचा साठा जप्त; एका तरुणास अटक

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
प्रातिनिधिक छायाचित्र – Sangli Today

सांगली : सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयाजवळ अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू व पानमसाल्याचा सुमारे 30 लाख 90 हजार 440 रुपयांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून, इतर संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलेगर यांना शुक्रवारी सायंकाळी प्रतिबंधित तंबाखू व पानमसाल्याची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सांगलीवाडी परिसरात सापळा रचून पिकअप जीप (MH 10 CR 6460) थांबवण्यात आली.

तपासादरम्यान वाहनातील पोती आणि बॉक्स तपासले असता त्यामध्ये 41 मोठी पोती आणि 21 मोठे बॉक्स भरून सुगंधी तंबाखू व पानमसाला आढळून आला. सदर माल महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असल्याने पुढील कारवाईसाठी वाहन सांगली शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

या प्रकरणी वाहन चालक विश्वास भारत शिंदे (वय 25, सध्या रा. मिरज एमआयडीसी, मूळ रा. बेवनूर, ता. जत) याला अटक करण्यात आली आहे. तसेच संशयित उत्पादक आनंदकुमार परशुराम बालदी, जितेंद्र कुमार प्रजापती आणि संशयित पुरवठादार उमेश पाटील (कुडची) व अतुल कश्यप (हुबळी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित तंबाखू, पानमसाला साठ्यासह पिकअप जीप असा एकूण 30.90 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सांगली शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: ऊसतोड मजूर पुरवण्याचे आमिष; वाहतूकदाराची साडेआठ लाखांची फसवणूक; मुकादमावर गुन्हा दाखल.

TAGGED:
Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा