सांगली : मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आणि ब्लोअर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे सुमारे ११ लाख रुपये किमतीचे तीन ट्रॅक्टर आणि तीन ब्लोअर जप्त केले असून, या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरज ग्रामीण, भोसे परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातून ट्रॅक्टर व ब्लोअर चोरी होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.
दोन संशयितांच्या अटकेनंतर उलगडा
या कारवाईत नंदकुमार चौगुले (रा. भोसे, ता. मिरज) आणि बसवराज हिप्परगी (रा. बेडरहट्टी, जि. बेळगाव, कर्नाटक) या दोघांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत २०२४ आणि २०२५ दरम्यान मिरज ग्रामीण भागातून दोघांनी ट्रॅक्टर व ब्लोअर चोरी करून ते विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.
११ लाख रुपये किंमतीच मुद्देमाल जप्त
पोलिसांनी तपासादरम्यान विविध ठिकाणांहून सुमारे २ लाख रुपये किमतीचा एक ट्रॅक्टर, ८० हजार रुपये किमतीचा ब्लोअर, २ लाख ७० हजार रुपये किमतीचा ‘कुबोटा’ ट्रॅक्टर, ५० हजार रुपये किमतीचा औषध फवारणी ब्लोअर, तसेच सुमारे ४ लाख रुपये किमतीचा ‘कुबोटा २१ HP’ ट्रॅक्टर जप्त केला आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे ११ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणात आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने, मिरज ग्रामीण पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: जिल्ह्यात FDA कारवाई सुरू असतानाच MRP पेक्षा जास्त दराने सिगारेट विक्री सुरू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










