सांगली : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर केला असून, सांगली जिल्ह्यात ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ही माहिती दिली.
या निवडणूक कार्यक्रमात जिल्हा परिषद सांगलीसह आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा–ईश्वरपूर, शिराळा आणि मिरज या दहा पंचायत समित्यांचा समावेश आहे. राज्यातील एकूण १२ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: प्रचार जोमात; मोबाईलवर येणाऱ्या ऑटो कॉल्समुळे नागरिक त्रस्त.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










