सांगली : शहरातील सोनार गल्ली परिसरात सोमवारी एका नाल्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. सायंकाळी उशिरापर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती.
नाल्यात मृतदेह आढळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ सांगली शहर पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केले. रेस्क्यू पथकाने नाल्यातून मृतदेह बाहेर काढला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे अंदाजे वय ५० ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने नेमका मृत्यू कधी झाला, याबाबत शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्टता येणार आहे.
पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा: प्रचार जोमात; मोबाईलवर येणाऱ्या ऑटो कॉल्समुळे नागरिक त्रस्त.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










