सांगली : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सांगली जिल्हा परिषद व आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा–ईश्वरपूर, शिराळा आणि मिरज या दहा पंचायत समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी दिली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, निकाल जाहीर होईपर्यंत ती अंमलात राहणार आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यात 61 गट आणि 122 गणांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. यासाठी एकूण 18 लाख 18 हजार 736 मतदार असून, 2039 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात होण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर प्रांताधिकारी किंवा तहसीलदार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कालावधीत सर्व संबंधितांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे आणि निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
निवडणूक कार्यक्रम (सविस्तर वेळापत्रक)
मतदार यादी ग्राह्य धरण्याची तारीख: 1 जुलै
निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धी: 16 जानेवारी 2026
नामनिर्देशन अर्ज सादर:
16 ते 20 जानेवारी 2026 (सकाळी 11 ते दुपारी 3)
21 जानेवारी 2026 (सकाळी 11 ते दुपारी 2)
(18 जानेवारी – रविवार सुट्टी)
नामनिर्देशन छाननी: 22 जानेवारी 2026 (सकाळी 11 पासून)
वैधरित्या उमेदवारांची यादी: 22 जानेवारी 2026 (छाननीनंतर)
उमेदवारी मागे घेणे:
23, 24 व 27 जानेवारी 2026 (सकाळी 11 ते दुपारी 3)
(25 जानेवारी रविवार, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन – सुट्टी)
निशाणी वाटप व अंतिम यादी: 27 जानेवारी 2026 (दुपारी 3.30 नंतर)
मतदान: 5 फेब्रुवारी 2026 (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)
मतमोजणी: 7 फेब्रुवारी 2026 (सकाळी 10 पासून)
निवडून आलेल्या सदस्यांची राजपत्रात घोषणा: 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत.
हेही वाचा: जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हत्यारे व दारुगोळा बाळगण्यास मनाई.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










