सांगली : कडेगाव तालुक्यातील वाजेगाव येथे तीन महिन्यांपूर्वी बंद घर फोडून दागिने चोरण्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला असून, रचित ऊर्फ डोक्या इन्कलाब काळे (वय 20, रा. हनुमानगर, ईश्वरपूर) याला अटक करण्यात आली आहे.
वाजेगाव येथील सुमन बाबुराव माने यांच्या बंद घरातून 2 ते 7 डिसेंबरदरम्यान सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून सुरू होता.
तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा सहभाग उघड झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने दुचाकीवरून वाजेगाव येथे जाऊन घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीतील रोकड खर्च झाल्याचेही त्याने सांगितले.
या कारवाईत आरोपीकडून १ लाख ६६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २ लाख ७१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी चिंचणी-वांगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस नोंदीनुसार रचित ऊर्फ डोक्या काळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा: माधवनगर परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










