सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
अंतिम निकालानुसार ७८ जागांच्या महापालिकेत भाजपने ३९ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने १८ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने १६ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने ३ जागा, तर शिंदे गट शिवसेना २ जागांवर विजयी झाली आहे.
या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), मनसे तसेच इतर पक्षांना एकही जागा मिळालेली नाही.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ११ मधून काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाचे विद्यमान नगरसेवक मनोज सरगर यांचा ७,५०७ मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे.
हेही वाचा: सांगलीत ड्राय डे लागू असतानाही शहरालगतच्या भागात दारू दुकाने सुरू; बंदीचा परिणाम काय?.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










