मिरज : मिरज तालुक्यातील मालगाव येथे भाड्याच्या खोलीला दिलेल्या लाईट कनेक्शनच्या कारणावरून भावकीतील दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही गटांतील एकूण सात जण जखमी झाले असून, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार दोन्ही गटांतील आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लक्ष्मी महेश आवटी (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुरेश आण्णाप्पा आवटी यांनी घराजवळील भाड्याच्या खोलीत लाईट कनेक्शन दिले होते. याबाबत जाब विचारण्यासाठी त्यांचे दिर उमेश आवटी गेले असता, सुरेश आवटी, विनोद आवटी, रेखा आवटी आणि प्रदीप मल्लाप्पा आवटी यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दिलीप आवटी यांनी घराच्या दरवाजावर लाथा मारून नुकसान केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
याच घटनेप्रकरणी दुसऱ्या गटाकडूनही मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, दोन्ही गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, काही जणांना मारहाणीत दुखापत झाली आहे.
घटनेची दखल घेत मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










