सांगली : प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल याच्याविरोधात सांगली येथील एका तरुणाने आर्थिक व्यवहाराबाबत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. विज्ञान माने (रा. सांगली) या तरुणाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार सादर करत आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.
तक्रारदार विज्ञान माने यांच्या म्हणण्यानुसार, ‘नजरिया’ नावाच्या चित्रपटाशी संबंधित काम देण्याचे तसेच चित्रपटात गुंतवणूक केल्यास आर्थिक परतावा मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. पलाशने वेळोवेळी एकूण सुमारे ४० लाख रुपये घेतल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर गुंतवणुकीवर परतावा मिळेल, तसेच चित्रपटात अभिनयाची संधी देण्यात येईल, असे पलाश मुच्छलकडून सांगण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र अपेक्षित स्वरूपात काम किंवा आर्थिक परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी सध्या कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून, तक्रार प्राथमिक स्वरूपात असून पोलीस स्तरावर त्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही.
तसेच, या आरोपांबाबत संगीतकार पलाश मुच्छल यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. चौकशीअंती पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: आष्टा मारहाण प्रकरणाचा निकाल; चौघांना तीन वर्षांचा कारावास.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










