धामणी रस्त्यावरील नर्सरीला आग; तरुण महिलेचा होरपळून मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
धामणी रस्त्यावरील मयूर नर्सरीला लागलेल्या आगीची घटना | फोटो : संकलन – Sangli Today

सांगली : शहरातील धामणी रस्त्यावर असलेल्या मयूर नर्सरीला लागलेल्या आगीत एका तरुण महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. निकिता शिव मनगुळे-लोंढे (वय २५, रा. कागवाड, जि. बेळगाव) असे मृत महिलेचे नाव असून, विश्रामबाग पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नर्सरीतीला आग लागली. आगीमुळे नर्सरीतील साहित्य व झाडे जळून खाक झाली. या आगीमुळे नर्सरीतील पत्र्याच्या शेडमध्ये राहात असणारी निकिता मनगुळे-लोंढे ही महिला होरपळून गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. दरम्यान, आगीच्या वेळी मृत महिलेचा पती घटनास्थळी नसल्याची माहिती समोर आली असून, तो त्या वेळी नेमका कुठे होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

मृत महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शॉर्टसर्किट, अपघात किंवा अन्य कारणांबाबत पोलीस विविध शक्यता तपासत आहेत.

घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, घटनास्थळाची पाहणी, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा: सांगलीतील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा