तासगाव : सांगली जिल्ह्यातील नागाव कवठे (ता. तासगाव) येथे छेडछाडीच्या प्रकाराबाबत जाब विचारल्याने झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तुषार कृष्णा मंडले (वय १८, रा. नागाव कवठे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये ओंकार सुरेश वाघमोडे (वय १९) आणि एका विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन बालकाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ओंकार हा तुषारच्या नात्यातील एका मुलीची छेड काढत असल्याचा आरोप आहे. या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी तुषार ७ जानेवारी रोजी कवठेएकंद परिसरातील आरफळ कालव्याजवळ ओंकारकडे गेला होता. यावेळी दोघांमध्ये वाद झाला.
वादादरम्यान संशयित ओंकारसोबत असलेल्या अल्पवयीनाने तुषारला पाठीमागून पकडले, तर ओंकारने चाकूने तुषारवर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाला होता.
जखमी अवस्थेत तुषारला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी ओंकार वाघमोडेला तातडीने अटक केली असून, अल्पवयीनाबाबत कायद्यानुसार स्वतंत्र कार्यवाही सुरू असून, तासगाव पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा: धामणी रस्त्यावरील नर्सरीला आग; तरुण महिलेचा होरपळून मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










