मिरज : शहरातील सुमतीनगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 5 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुमतीनगर येथील रहिवासी दीपक सूर्यकांत शहा हे 22 जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घराबाहेर गेले होते. ते 23 जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजता घरी परतले असता, घराचे कुलूप तोडलेले आढळून आले.
अज्ञात चोरट्याने बंद घरावर पाळत ठेवून कुलूप तोडत घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लाकडी कपाट उचकटून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 5 लाख 57 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: सांगली महापालिकेची महापौर-उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारीला; राजकीय हालचालींना वेग.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










