सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीकडून गटनेते (Group Leader) म्हणून संदीप सुरेश आवटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.
दि. 27 जानेवारी 2026 रोजी काढण्यात आलेल्या या पत्रानुसार, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील भाजप गटनेतेपदासाठी संदीप आवटी यांचे नाव निश्चित करण्यात आले असून, पुढील आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
या पत्राची प्रत पालकमंत्री, निवडणूक प्रमुख तसेच निवडणूक प्रभारी यांनाही पाठवण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेतील भाजप नेतृत्वाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
संदीप आवटी यांच्या नियुक्तीमुळे महानगरपालिकेतील भाजपची भूमिका अधिक संघटित आणि प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात शहराच्या विकासाशी संबंधित विषयांवर भाजप गट अधिक ठोस भूमिका मांडेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
हेही वाचा: राज्यस्तरीय ‘कौस्तुभ पुरस्कार’ संत माता सुदिक्षा यांना प्रदान; सांगलीत गौरव सोहळा संपन्न.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










