उसाच्या वाड्यावरून झालेल्या वादातून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कडेगाव तालुक्यात खळबळ

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
प्रतीकात्मक फोटो – Sangli Today

कडेगाव : ढाणेवाडी (ता. कडेगाव) येथे उसाच्या वाड्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर झालेल्या मारहाणीत एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विनायक प्रभाकर ढाणे (वय ३५, रा. ढाणेवाडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ढाणेवाडी येथील विनायक ढाणे यांच्या चुलत्यांची उसाची शेती आहे. गुरुवारी (दि. २९) सकाळी साडेनऊच्या सुमारास उसाचे वाडे देण्यावरून काही तरुणांशी विनायक यांचा वाद झाला. हा वाद पुढे वाढत गेला आणि त्यातून संबंधित तरुणांनी विनायक यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मारहाणीनंतर विनायक यांची प्रकृती अचानक खालावली. नातेवाईकांनी त्यांना तातडीने कडेगाव येथील रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

विनायक ढाणे यांचा मृत्यू नेमका मारहाणीमुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत सध्या स्पष्टता नसून उत्तरीय तपासणी अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमात बदल; 7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा