मिरज : ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयांची सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवत मिरज पूर्व भागातील सात शेतकऱ्यांची सुमारे ३५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सचिन बळवंत कांबळे (रा. येळावी, ता. तासगाव) याच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात व्यंकोचीवाडी (एरंडोली, ता. मिरज) येथील शेतकरी आनंदा हरी माने यांच्यासह व्यंकोचीवाडी, संतोषवाडी आणि शिपूर परिसरातील एकूण सात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. संशयित आरोपी कांबळे याने समाजकल्याण विभागात ओळखी असल्याचा दावा करत शासनाच्या योजनेतून ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळवून देतो, असे सांगितले होते.
त्यानंतर शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन आरोपीने वेगवेगळ्या बँकांतून प्रत्येकी साडेचार ते साडेपाच लाख रुपयांचे ट्रॅक्टर कर्ज मंजूर करून घेतले. एकूण सुमारे ३५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या ताब्यात न देता, ते परस्पर इतरांना विकून टाकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर झाल्यानंतरही ट्रॅक्टर न मिळाल्याने त्यांनी आरोपीकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, आरोपीने आज देतो, उद्या देतो असे सांगत वर्षभर टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आनंदा माने यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली.
मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, कर्ज व्यवहार, ट्रॅक्टर विक्री आणि आर्थिक व्यवहारांची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाडच्या विकासाचा ‘रोलिंग प्लॅन’; रस्ते, भूसंपादन व नवीन उद्यानांबाबत आयुक्तांचे निर्देश.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










