मतमोजणी केंद्रांपासून २०० मीटर परिसरात जमावबंदी; झेरॉक्स, टेलिफोन बुथ, फॅक्स व ध्वनीक्षेपकांवर बंदी

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
मतमोजणी दिवशी शांतता राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू. | फोटो : प्रतिनिधिक छायाचित्र

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ अंतर्गत ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांच्या परिसरात कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. शांतता राखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश जारी केले आहेत.

आदेशानुसार मतमोजणी केंद्रापासून २०० मीटरच्या परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या एकत्रित जमावास मनाई करण्यात आली आहे. तसेच या परिसरात झेरॉक्स मशीन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपकांचा वापर बंद राहणार असून, मतमोजणी केंद्रात मोबाईल व पेजर वापरण्यासही मनाई असेल.

हे आदेश निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागू होणार नाहीत. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून संबंधित मतमोजणी केंद्रावरील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध अंमलात राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात एकूण १० मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होणार असून, प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सुरक्षात्मक उपाययोजना केल्याचे सांगण्यात आले आहे.

तालुकानिहाय मतमोजणी केंद्रे

  • आटपाडी: दुसरा मजला हॉल, नवीन प्रशासकीय इमारत, तहसीलदार कार्यालय
  • जत: जुने शासकीय धान्य गोदाम क्र. २, नवीन प्रशासकीय इमारतीसमोर
  • खानापूर: इनडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर, बळवंत कॉलेज, विटा
  • कडेगाव: औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कराड-कडेगाव रोड
  • तासगाव: शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दत्तमाळ
  • कवठेमहांकाळ: पुरवठा शाखेसमोरील मोकळी जागा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
  • पलूस: मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, न्यायालयाजवळ
  • वाळवा: शासकीय धान्य गोदाम, बहे रोड, ईश्वरपूर
  • शिराळा: श्री गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • मिरज: शासकीय नवीन धान्य गोदाम, वैरण बाजार

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यावर आमदार सुहास बाबर यांना गिरीश महाजन यांचा सल्ला.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा