सांगली : कुपवाड रोडवरील लक्ष्मी देऊळ हडको कॉलनी परिसरातील एका रहिवासी घराला काल दि. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र, महानगरपालिका अग्निशमन दलाने वेळीच केलेल्या कारवाईमुळे आग आटोक्यात आली व मोठा अनर्थ टळला.
अग्निशमन दलाला दुपारी २.२२ वाजता हडको कॉलनी येथील घराला आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांतच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत घराच्या आतील भागात आग भडकली होती.
बचावकार्यादरम्यान घरात गॅस सिलिंडर असल्याचे लक्षात आल्यानंतर जवानांनी तत्काळ कारवाई करत तीन भरलेले आणि एक रिकामा असे चार गॅस सिलिंडर सुरक्षितपणे घरातून बाहेर काढले. सिलिंडर वेळेत बाहेर काढल्यामुळे मोठा स्फोट होण्याचा धोका टळला.
यानंतर पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली. या आगीत घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले, तरी कोणालाही इजा झालेली नाही.
हेही वाचा: मतमोजणी केंद्रांपासून २०० मीटर परिसरात जमावबंदी; झेरॉक्स, टेलिफोन बुथ, फॅक्स व ध्वनीक्षेपकांवर बंदी.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










