सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वाहन तपासणीदरम्यान मिरज तालुक्यातील कळंबी परिसरात महसूल विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने सुमारे १५ किलो चांदी जप्त केली. या चांदीची अंदाजे किंमत सुमारे ४० लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती आहे.
आचारसंहितेमुळे महामार्गावर वाहनांची कसून तपासणी सुरू असताना गुरुवारी दुपारी कळंबी परिसरात एका मोटारीची झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणात चांदी आढळून आली. संबंधित व्यक्तीस चांदी व वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चांदी हुपरी (जि. कोल्हापूर) येथून सोलापूरकडे व्यापारासाठी नेली जात होती, असा दावा संबंधित व्यक्तीने केला आहे. मात्र, यासंदर्भातील खरेदीची बिले, जीएसटी कागदपत्रे आणि इतर व्यवहाराची माहिती तपासली जात आहे. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू होती.
हेही वाचा: सांगलीत लग्नसमारंभातून ४ लाखांचे सोन्याचे गंठण लंपास; संशयित तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










