सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असल्याने मतदान होणाऱ्या क्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना त्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेसाठी शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मतदान कर्तव्यावर नियुक्ती करण्यात आली असून, सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान सुरू होणार असल्याने शाळांमध्ये नियमित कामकाज ठेवणे शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार ७ फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार निवडणूक क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी लागू राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत.
हेही वाचा: १० वी १२ वी परीक्षा काळात केंद्रांच्या १०० मीटर परिसरात जमावबंदी; सांगली जिल्ह्यात मनाई आदेश लागू.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










