सांगली : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 चा अंतिम निकाल मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आला असून उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. हा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 ही परीक्षा 23 नोव्हेंबर 2025 रोजी झाली होती. या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची 19 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर प्राप्त हरकतींच्या आधारे अंतिम उत्तरसूची 12 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
तसेच, अंतिम उत्तरसूचीच्या अनुषंगाने आवश्यक दुरुस्त्या करण्यात आलेले शुद्धीपत्रक 2 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आले होते. या सर्व प्रक्रियेनंतर MAHATET 2025 चा अंतिम निकाल 3 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
MAHATET परीक्षा उत्तीर्ण होणे हे राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पदांसाठी पात्रतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यभरातील परीक्षार्थ्यांचे लक्ष लागून राहिले होते. उमेदवारांनी आपला निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे.
हेही वाचा: पलूस तालुक्यात शेजारच्या उसाला लागलेली आग विझवताना भीषण दुर्घटना; ८५ वर्षीय शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










