सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी सांगली जिल्ह्यात झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के मतदान झाले आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदानाचा आढावा घेतला असता पलूस तालुक्यात सर्वाधिक 75.75 टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ वाळवा तालुक्यात 74.71 टक्के, आटपाडीमध्ये 73.41 टक्के आणि कडेगाव तालुक्यात 71.55 टक्के मतदान नोंदवले गेले.
इतर तालुक्यांमध्ये शिराळा येथे 70.20 टक्के, मिरजमध्ये 66.71 टक्के, जतमध्ये 67.39 टक्के, खानापूर (विटा) येथे 67.29 टक्के, तासगावमध्ये 66.37 टक्के तर कवठेमहांकाळ तालुक्यात 65.93 टक्के मतदान झाल्याची नोंद अधिकृत अहवालात आहे.
जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत दुपारनंतर मतदानाची टक्केवारी हळूहवू वाढत गेली आणि अखेरीस मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
दरम्यान, या निवडणुकीसाठीची मतमोजणी प्रशासनाने निश्चित केलेल्या तालुकानिहाय केंद्रांवर होणार असून, या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: 9 फेब्रुवारीला 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी; सांगली जिल्हा प्रशासन सज्ज.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










