सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये सांगली रेल्वे स्थानकासमोर नाल्याचे दूषित पाणी तुंबून राहिल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वे स्थानकासमोर असणाऱ्या म्हसोबा मंदिराशेजारी नाल्यामधून आलेले साचून राहिलेले घाण पाणी, प्लास्टिक कचरा व सेंद्रिय कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून, डासांचे प्रमाणही वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले. नाल्याच्या समोरच निवासी वस्ती असल्यामुळे येथील कुटुंबांना आरोग्यविषयक धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे शहर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी भित्तीचित्रांच्या माध्यमातून स्वच्छतेचे संदेश दिले जात आहेत. ‘सांगलीच्या भिंती बोलू लागल्यात’ या उपक्रमांतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्याचा प्रयत्न सुरू असताना, प्रत्यक्षात काही भागांमध्ये अशा समस्या कायम असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नाल्याची नियमित साफसफाई होत नसल्याने पाणी तुंबून ते इतरत्र पसरत आहे. उष्ण हवामानात साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी अधिक वाढत असून, परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महानगरपालिकेने तातडीने नाल्याची स्वच्छता करून पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा: सांगली जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक 2026 : तालुकानिहाय अंतिम मतदानाची टक्केवारी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










