सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेचा 28 वा वर्धापन दिन आज, सोमवार 9 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत असून या निमित्ताने महापालिका मुख्यालयात सकाळी 10.30 वाजता दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले जाणार आहे. या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
9 फेब्रुवारी 1998 रोजी सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका स्थापन झाली असून सांगली–मिरज शहरांसह कुपवाड परिसरातील नागरी विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व सार्वजनिक सुविधा व्यवस्थापनाची जबाबदारी या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आहे.
दरवर्षी 9 फेब्रुवारीला महानगरपालिकेचा स्थापना दिन वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हेही वाचा: सांगली रेल्वे स्थानकासमोर नाला तुंबला; प्रभाग क्र. 9 मधील नागरिकांसाठी दुर्गंधी व डासांचा त्रास रोजचाच.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










