मिरज : सांगली शहरालगतच्या माधवनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे पडसाद स्थानिक निवडणूक मतदानावर उमटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
माधवनगरमध्ये सुमारे सलग पाच दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना गैरसोयींचा मोठा सामना करावा लागला. निवडणुकीच्या दिवशी सकाळी काही ठिकाणी पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला असला तरी या कालावधीत झालेल्या त्रासाबद्दल स्थानिकांमधून असंतोष व्यक्त करण्यात येत होता.
“पाणीपुरवठा नियमित नसल्याने दैनंदिन कामांवर परिणाम झाला. प्रशासनाने याकडे वेळेत लक्ष द्यायला हवे होते,” अशी भावना काही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, माधवनगरमध्ये दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी तुलनेने कमी राहिल्याचे सांगितले जाते. काही प्रभागांमध्ये मतदान सुमारे 45 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिल्याचे सांगितले जाते, तर इतर भागांत सरासरी 52 ते 55 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
दरम्यान, शेजारच्या बुधगाव, कवलापूर, बिसूर, कावजी खोतवाडी आणि वाजेगाव परिसरात मात्र मतदानासाठी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद दिसून आला. संबंधित जिल्हा परिषद मतदारसंघात विविध पक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाल्याने निकालाबाबत उत्सुकता कायम आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून नियमित व सुरळीत पाणी पुरवठ्याची अपेक्षा व्यक्त केली असून, या प्रश्नाचा निवडणुकीच्या निकालावर कितपत आणि काय परिणाम होतो याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचा 28 वा वर्धापन दिन आज; मुख्यालयात सकाळी 10.30 वाजता दीपप्रज्वलन कार्यक्रम.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










