कडेगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कडेगाव तालुक्यात काँग्रेसने प्रभावी कामगिरी करत बहुमत मिळवले आहे. उपलब्ध अधिकृत निकालानुसार तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असून पंचायत समितीच्या आठपैकी सात गणांवरही काँग्रेसने विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत पाहायला मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासून काँग्रेस उमेदवार आघाडीवर होते. अखेरीस काँग्रेसने सात पंचायत समिती गणांवर विजय मिळवत तालुक्यातील सत्ता समीकरणांमध्ये बदल घडवून आणला. भाजपला पंचायत समितीच्या कडेपूर या एकाच गणावर समाधान मानावे लागल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा देत गुलाल उधळत व फटाक्यांची अतिशबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला.
काँग्रेस नेते डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील संघटनात्मक ताकद व कदम यांचा स्थानिक पातळीवरील जनसंपर्क याचा या निकालावर परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या निकालामुळे आगामी स्थानिक राजकारणात कडेगाव तालुक्यात काँग्रेस अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचा 28 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










