सांगली महापालिकेत नवे राजकीय समीकरण? भाजप–राष्ट्रवादी (श. प.) नेत्यांची हॉटेलमध्ये बैठक

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली, मिरज कुपवाड महानगरपालिका. | छायाचित्र : Sangli Today

सांगली : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर अनपेक्षित राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापौर व उपमहापौर निवडीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या नेत्यांची येथील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नगरसेवकही उपस्थित असल्याची माहिती समोर येताच शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने आघाडी केली होती. मात्र निकालानंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेसाठी पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या. त्यातच भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीची घोषणा झाल्यानंतर राजकीय चित्र अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.

भाजपकडून काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांना सत्तेत सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच हॉटेलमधील झालेली ही बैठक या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

बैठकीला दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते, गटनेते व नगरसेवक उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या पार्श्वभूमीवर “महापालिकेत नवे राजकीय समीकरण तयार होते आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सांगली महापालिकेतील सत्तासमीकरण पुढील काही दिवसांत कोणत्या दिशेने वळणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: सांगलीत बारावीच्या परीक्षेवर डिजिटल वॉच; झूम लिंकद्वारे थेट देखरेख, जिल्ह्यातील १३०७ वर्गांचे लाईव्ह रेकॉर्डिंग.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा