सांगली : जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी एकूण 751 कोटी 8 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा आराखडा उद्या राज्यस्तरीय समितीसमोर सादर करण्यात येणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, पर्यटन व वीजपुरवठा या क्षेत्रांसाठी वाढीव निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवून विकासकामे गतीने पूर्ण करावीत, असे ते म्हणाले.
सन 2026-27 साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत 663 कोटी 80 लाख रुपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 86 कोटी रुपये, आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 1 कोटी 28 लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय 206 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणीही करण्यात आली आहे.
ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. बैठकीस खासदार, आमदार, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: सांगली महापालिकेत नवे राजकीय समीकरण? भाजप–राष्ट्रवादी (श. प.) नेत्यांची हॉटेलमध्ये बैठक.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










