सांगली : जवळपास दोन दशकांनंतर सांगलीत महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन होत आहे. विद्यार्थी विभागाचे ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कलाविश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन येथे भरविण्यात येणार आहे.
१६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती कला संचालनालयाचे महाराष्ट्र राज्यचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे यांनी दिली.
राज्यातील विविध शासकीय व शासनमान्य कला संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. यावर्षी राज्यभरातून ३ हजार ४९० विद्यार्थ्यांच्या एकूण ५ हजार ६८० कलाकृती प्राप्त झाल्या असून त्यापैकी १ हजार २७५ कलाकृतींची अंतिम निवड करण्यात आली आहे.
प्रदर्शनात रेखा व रंगकला, उपयोजित कला, शिल्पकला, मुद्राचित्रण, कला शिक्षक प्रशिक्षण, कला व हस्तव्यवसाय, मूलभूत अभ्यासक्रम आणि दिव्यांग विभाग अशा एकूण आठ विभागांचा समावेश आहे. प्रत्येक विभागातून चार उत्कृष्ट कलाकृतींना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
यंदा प्रथमच शासकीय रेखाकला परीक्षेतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थी तसेच बाल चित्रकला स्पर्धेतील राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचाही राज्य कला प्रदर्शनाच्या व्यासपीठावर गौरव केला जाणार आहे.
सात दिवस चालणारे हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.
हेही वाचा: पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्जाची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










