सांगली : अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला बुधवारी प्रत्यक्ष सुरुवात झाली. सांगली जिल्ह्यातील ५९ रिक्त पदांसाठी ही भरती होत असून पहिल्या दिवशी महिला उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली.
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या या प्रक्रियेसाठी ७४७ महिला उमेदवार पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी ६०४ महिला प्रत्यक्ष उपस्थित राहिल्या. कागदपत्रांची पडताळणी आणि शारीरिक मोजमाप (उंची चाचणी) पूर्ण केल्यानंतर ५४२ महिला उमेदवारांनी मैदानी चाचणी पूर्ण केली.
गुरुवारी पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली भरती सुरू झाल्यामुळे पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










